लोकसंख्या वाढ एक समस्या

                   Image result for लोकसंख्या वाढ एक समस्या
जागतिक लोकसंख्या म्हणजेच एकूण मानवी लोकसंख्या होय. इ.स. २००७च्या सुरुवातीला जागतिक लोकसंख्या ६.६ अब्ज झाली आहे.भारताची लोकसंख्या सुमारे १ अब्ज १५ कोटी एवढी आहे.मुंबई व कोलकाता ही आपल्या देशातील सर्वात जास्त लोकसंख्येची शहरे आहेत. ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात जास्त लोकसं़या असलेला जिल्हा आहे.
11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जावं अपत्य जन्माला आलं. तेव्हापासून हा दिवस `विश्वलोकसंख्या दिन’ म्हणून जगभर पाळला जातो. 1987 ते 2011 पर्यंत विश्वलोकसंख्या 2 अब्जाने वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली. लोकसंख्येचे हे आकडे अगदी `ओव्हरफ्लो’ होऊन वाहत आहेत.
                            Image result for लोकसंख्या वाढ एक समस्या
विसावे शतक हे जागतिक इतिहासात क्रांतिकारी शतक म्हणून ओळखले जाणार आहे. हय़ा शतकात अनेक विशेष महत्त्वाच्या, अनेक देशांच्या इतिहासाला कलाटणी देणार्या घटना, घडामोडी घडल्या. दोन जागतिक महायुध्दे, वसाहातिक देशांनी मिळविलेले स्वातंत्र्य, चंद्रावर मानवाचे पाऊल, अणुस्फोटामुळे समाप्त झालेले दुसरे महायुध्द, व्हिएतनामने अमेरिकेपुढे पत्करलेली शरणागती, अनेक मौलिक शोध, संशोधन, रशियाचा उदयास्त. हय़ा काही प्रतिनिधीक घडामोडी, घटना होत. हय़ाशिवाय 20व्या शतकात झालेली विश्वलोकसंख्येतील प्रचंड वाढ ही विशेष क्रांतिकारी घटना होय. 1927 साली विश्वलोकसंख्या होती 2 अब्ज, अवघ्या 30 वर्षात ती झाली 1959 मध्ये 3 अब्ज आणि 39 वर्षात विश्वलोकसंख्या दुप्पट म्हणजे 6 अब्ज. 11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जाचे अपत्य जन्माला आले तेव्हापासून हा दिवस `विश्वलोकसंख्या दिन’ म्हणून जगभर पाळला जात आहे. 1987 ते 2011 पर्यंत विश्वलोकसंख्या 2 अब्जाने वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली.









आशिया, युरोप, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हय़ा पाच खंडामधील देशात सर्वात कमी लोकसंख्या आणि अगदी कमी वेगाने वाढणारी लोकसंख्या आहे ऑस्ट्रेलियाची. जगाच्या एकूण लोकसंख्येत 60 टक्के आशियामध्ये आहे. कारण चीन व भारत हे पहिल्या दोन क्रमांकाचे देश हय़ा खंडामध्ये आशियात आहेत. अमेरिकेचे क्षेत्रफळ भारताच्या तिप्पट आहे पण लोकसंख्या मात्र भारताच्या लोकसंख्येच्या 25 टक्के आहे म्हणजे 30 कोटी. 21व्या शतकात आशिया हा सर्वात अधिक लोकसंख्येचा खंड असेल. आफ्रिका खंडाची लोकसंख्या तिप्पटीहून अधिक असेल. 2011 मध्ये आफ्रिकाची लोकसंख्या होती 1 अब्ज. ती लोकसंख्या 2100 मध्ये 3.6 अब्ज होईल. 2011 मध्ये इतर खंडाची मिळून लोकसंख्या होती 1.7 अब्ज. 2060 मध्ये ही लोकसंख्या 2 अब्ज असेल. युरोपची लोकसंख्या 2025 मध्ये 0.74 अब्ज असेल आणि त्यानंतर युरोपच्या लोकसंख्येत आणखी घट होईल. आफ्रिका खंडाच्या लोकसंख्येत वाढ दर वर्षी 2.3 टक्के होत आहे तर आशिया खंडाची वाढ होत आहे 1 टक्के. जगाची लोकसंख्या होती अशी – 1804 – 1 अब्ज, 1927 – 2 अब्ज, 1959 – 3 अब्ज, 1974 – 4 अब्ज, 1987 – 5 अब्ज, 1999 – 6 अब्ज, 2011 – 7 अब्ज. संयुक्त राष्ट्रसंघाने 1999 – 6 अब्ज एक मोठा मैलाचा दगड म्हणून मानला.
                Image result for लोकसंख्या वाढ एक समस्या

लोकसंख्या वाढीचे कारणे खालीलप्रमाणे आहेत

१) जन्म-मृत्युदर :- आपल्या देशात मृत्युदरात घट झालेली आढळून येते. परंतु जन्मदर मात्र त्या मानाने घटलेली नाही. आपल्या देशाचा १००० लोकांमध्ये जन्मदर २७.५ आहे व मृत्युदर ०.५ आहे. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होते.
२) अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा :- समाजामध्ये काही अंधश्रद्धा असतात. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मेल्यावर पाणी पाजण्यास व अग्नी देण्यास इस्टेटीला वारस पाहिजे, मुलगाच पाहिजे, त्यामुळे मुलाची वाट पहात कुटुंबात माणसे वाढतात. मुलगी ही परक्याचे धन समजले जाते त्यामुळे मुलगा होईपर्यंत कुटुंब नियोजन केले जात नाही. काही वेळेस पहिल्या पत्नीला मुलीच झाल्या तर दुसरा विवाह केला जातो व त्या पत्नीकडूनही कुटुंब वाढविले जाते. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होताना दिसून येते.
                      Image result for लोकसंख्या वाढ एक समस्या
३) जन्म ही ईश्वरी देणगी आहे :- काही समाजामध्ये कुटुंब नियोजन करणे पाप मानले जाते. जन्म ही ईश्वरीय देणगी समजले जाते. या अंधश्रद्धेपोटी लोकसंख्या वाढ होताना आढळून येते.
४) वैद्यकीय सुविधांचा अभाव व अज्ञान :- वैद्यकीय सुविधा असून देखील त्या ग्रामीण भागामध्ये पोहोचत नाहीत. काही वेळेस कुटुंब नियोजनांच्या साधनांची माहिती असते. परंतू त्याची उपलब्धता नसल्यामुळे म्हणजेच या सुविधांचा अभाव असल्यामुळे तीचा वापर केला जात नाही. गैरसमजुती व अज्ञानामुळे माहिती देवून देखील त्याचा वापर केला जात नाही. या कारणांमुळे लोकसंख्येमध्ये वाढ होताना दिसून येते.
                     Image result for लोकसंख्या वाढ एक समस्या
५) बालमृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण :- ग्रामीण भागांमध्ये बालमृत्यूचे व अर्भक मृत्यूचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक मुलांना जन्म दिला जातो. त्यामुळेही लोकसंख्येमध्ये वाढ होते.
६) मुलीच्या लग्नाचे वय :- ग्रामीण भागामध्ये १५ ते १६ व्या वर्षीच मुलीचे लग्न करून दिले जाते. लग्न झाल्यावर लवकर मुले होतात. त्यावर नियंत्रण करण्याकरिता तिला कुटुंबनियोजनाबद्दलच्या साधनांचा व माहितीचा अभाव व अज्ञान असते. या वयामध्ये ती कोणत्याही गोष्टींचे निर्णय कुटुंबामध्ये घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे वयाच्या पस्तीसाव्या वर्षापर्यंत ती गर्भधारणा करू शकते. त्यामुळे अनेक अपत्य जन्माला येतात. हे देखील लोकसंख्या वाढीमध्ये भर घालणारे घटक आहेत.
७) निरक्षरता :- आपल्या देशात निरक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. निरक्षरतेमुळे अंधश्रद्धा वाढतात. अशी लोकसंख्या वाढली तर माणसाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. शिवाय शासनालासुद्धा आरोग्य सुविधा व इतर सुविधा पुरविणे अवघड होते. तेव्हा ही लोकसंख्यावाढ थांबविण्यासाठी विविध स्तरावर अनेक प्रयत्न चालू आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील स्त्री पुरुषामध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. लोकसंख्यावाढीमुळे अनेक अडचणी उभ्या राहतात. त्या संबंधीची जाणीव लोकांमध्ये निर्माण करायला हवी.
                    Image result for लोकसंख्या वाढ एक समस्या

लोकसंख्या वाढीचे परिणाम


१. अन्नधान्याचा तुटवडा – कुटुंबांमध्ये जास्त माणसे वाढली तर सर्वांना नीट आहार देणे अशक्य होते. कारण त्यावर खर्च जास्त होतो. उत्पन्न कमी व त्यामुळे महागाई वाढते. दुष्काळ पडला तर अन्नधान्य महाग होते व त्याचा पुरवठा करणे शासनाला देखील कठीण जाते. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेतीसाठी लागणा-या पाण्याची टंचाई तसेच पाणी अनेक कारणांसाठी वापरावे लागते. त्यामध्ये जर दुष्काळ पडला तर पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतीला पाणी देता येत नाही व अन्न धान्य मोठया प्रमाणावर म्हणजेच लोकसंख्येच्या प्रमाणत पिकविता येत नाही त्यामुळे महागाई वाढते व कुटुंबाला पुरेसा आहार मिळणे कठीण होते व यामधूनच कुपोषणाचे प्रमाण वाढते व अनेक रोग आजारांना सामोरे जावे लागते.
                       Image result for लोकसंख्या वाढ परिणाम
२. अपुरा निवारा – पूर्वी जर कुटुंबात ठरावीक माणसे राहत असतील तर त्यांना ते घर राहण्यास पुरते. परंतु त्याच कुटुंबात अनेक सदस्य वाढले तर ते घर अपुरे पडते व दुसरे बांधावे लागते. जरी जास्त घरे बांधली तरी जमीन वाढत नाही. त्याचा परिणाम अन्नधान्य पिकविण्यावर होते.
३. दळणवळण, शैक्षणिक, आरोग्य सुविधा यांचा अभाव – लोकसंख्या वाढल्यामुळे प्रवासाच्या ज्या सुविधा आहेत त्या अपु-या पडतात. तसेच अपघातांचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर शाळा कॉलेजमध्ये विध्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे गरीब मुलांना शिक्षण घेणे अवघड होते. वरील अडचणीबरोबर शासनाला आरोग्य सुविधा पुरविणे अवघड होते.
                             Image result for लोकसंख्या वाढ परिणाम
४. जंगलतोड – जळणासाठी लाकूड, घरबांधणी / फर्निचर यासाठी माणसाने जंगलतोड केली. लोकसंख्या वाढीचा परिणाम निसर्गावर झाल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले. तसेच उद्योगासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी सुद्धा जंगलतोड झाली. याचा परिणाम पाऊस वेळेत न पडण्यावर झाला.
५. स्थलांतर – नोकरी व्यवसायाच्या शोधार्थ होणा-या स्थलांतरामुळे शहरांची झपाटयाने वाढ होते व शहराच्या सर्व यंत्रणांवर ताण पडू लागतो. कारखान्याच्या धुराने, घाण पाणी नदीमध्ये सोडल्याने पाणी दूषित होते. वाहनामुळे हवा प्रदूषण होते.
६. साधनसंपत्ती व उर्जेची कमतरता भासते.
७. गुन्हेगारीचे वाढते प्रमाण – शिक्षण जरी मिळाले तरी नोकरी मिळत नाही व गरिबी असल्यामुळे जीवन व्यवस्थित जगता येत नाही, त्यामुळे गुन्हेगारी व अत्याचाराचे प्रमाण वाढते.
वरील सर्व कारणांमुळे आपल्याला स्वस्थ व सुरक्षित जीवन जगता येत नाही. ह्या सगळ्यांची तीव्रता कमी करायची असेल तर त्यावरचे उपाय आपण लगेचच आणि आपल्या कुटुंबापासून सुरु केले पाहिजेत.
reference
http://navshakti.co.in/
http://mr.vikaspedia.in/social-welfare

Comments

Post a Comment